IPL 2024 ( Live Cricket Score, KKR vs DC ) :- आयपीएल 2024 चा 47 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. या सामन्यास संध्याकाळी 7.30 वाजता कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सुरूवात होणार आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील KKR ने या मोसमात 8 सामने खेळले आहेत आणि 5 जिंकले आहेत. गेल्या सामन्यात त्याने दिल्लीचा पराभव केला होता. ऋषभ पंतचा संघ केकेआरच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. या सामन्यातही त्याला कडवे आव्हान उभे राहू शकते.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल ( Toss update ) हा दिल्ली कॅपिटल्स संघाच्या बाजूनं लागला आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरतील.
🚨 Toss Update 🚨
Delhi Capitals win the toss and elect to bat against Kolkata Knight Riders.
Follow the Match ▶️ https://t.co/eTZRkma6UM#TATAIPL | #KKRvDC pic.twitter.com/TdUxJxzKqV
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2024
दरम्यान, कोलकाता पाच विजय आणि आठ पैकी तीन पराभवानंतर 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर दिल्ली 10 पैकी पाच विजय आणि तितक्याच पराभवानंतर 10 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. आयपीएलच्या इतिहासात कोलकाता विरुद्ध दिल्ली यांच्यात एकूण 33 सामने खेळले गेले आहेत. यापैकी केकेआरने 17 सामने जिंकले असून दिल्लीने 15 सामने जिंकले आहेत.