पुणे – करोनाविरोधात लढा देणाऱ्या आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा आज बळी गेला आहे. समर्थ पोलिस ठाण्यातील वाहतूक पोलिसाची करोनाशी सुरु असलेली झुंज संपली आहे. दरम्यान, पुण्यात याआधीही एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, बुधवारी दिवसभरात 152 करोना बाधित सापडले. तर 165 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 43 जण व्हेंटिलेटरवर आहेत. बुधवारी विविध रुग्णालयांतून 113 जणांना डिस्चार्ज दिला. बाधितांची एकूण संख्या 3 हजार 899, तर घरी सुखरूप गेलेल्यांची संख्या 2 हजार 23 इतकी आहे. आतापर्यंत 221 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.