दौंड -दौंड शहरात एकास करोनाची लागण झाली असल्याने करोना शहराची पाठ सोडत नाही. सोमवारी (दि. 1) रोजी शहरातील एकाचा मृत्यू झाला होता. यानंतर 2 जून रोजी त्याचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी उपस्थित असणाऱ्यांपैकी त्यांच्या जवळच्या 48 नागरिकांची तपासणी करण्यात आली होती.
त्यामध्ये 44 जणांचा अहवाल आला. यात शहरातील सिंधी गल्ली येथील एका 76 वर्षीय पुरुषाची चाचणी पॉझिटीव्ह आली असून इतर 43 जण निगेटिव्ह आले आहेत. तर 4 जणांचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली. दरम्यान, या रुग्णाच्या अहवालामुळे करोना दौंड शहरवासियांची पाठ सोडत नसलायचे पाहावयास मिळत आहे.