मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी काही केल्या संपताना दिसत नाहीत. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अनिल देशमुख यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे.
अनिल देशमुख यांच्या सोबतच सचिन वाझेला देखील १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाण्यात आल्याचे समोर आले आहे.
या अगोदर न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाच्या विशेष सुट्टीकालीन एकलपीठाने रविवारी रद्द केला होता. तसेच देशमुख यांना १२ नोव्हेंबपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली गेली होती.
त्यानंतर त्यांची कोठडीची मूदत संपल्यामुळे त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश ईडीने दिले होते. आता पुन्हा एकदा त्यांना १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे.