मांजरी – महापालिका निडणुकांमध्ये शिवसेना समान जागा लढवेल अन्यथा स्वतंत्र लढण्याचा पर्याय आमच्यासाठी खुला आहे, असे स्पष्ट संकेत शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी दिले.
मुंढवा-केशवनगर येथील शिवसेनेचे युवानेते देवेंद्र भाट यांनी दीपावली निम्मित किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ तसेच मान्यवर व्यक्तींना गौरव पुरस्कार, स्नेह मेळावा आणि दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्याचे उद्घाटन अहिर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार महादेव बाबर, नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे, शहर प्रमुख संजय मोरे, जिल्हा प्रमुख विजय देशमुख, उपशहर प्रमुख समीर तुपे, हडपसर विधानसभा प्रमुख राजेंद्र बाबर, शहर उपसंघटक जान मोहंमद, सागर मोराळे, संजय सपकाळ, पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे, माजी उपसरपंच संजय गायकवाड, कॉंग्रेस नेते रमेश राऊत, विक्रम लोणकर, अप्पासाहेब व्यवहारे, निलेश गौडा, उमेश भाट, श्रीकांत बोरा, भरत शेंडकर, जितेंद्र लोणकर, यांच्यासह सेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर अथवा उपमहापौर करण्यासाठी शिवसैनिकांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहनही सचिन अहिर यांनी यावेळी केले. यावेळी किल्ले स्पर्धामधील विजेत्यांना सायकल व भेटवस्तू बक्षीस म्हणून देण्यात आल्या. क्रीडा, वारकरी संप्रदाय, धार्मिक, इतिहास, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना यावेळी गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमासाठी मुंढवा-केशवनगर शिवसेना शाखेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि मातोश्री प्रतिष्ठानचे सदस्य व देवेंद्रदादा भाट मित्रपरिवाराने परिश्रम घेतले. समीर तुपे यांनी आभार मानले.