Anant Ambani and Radhika Merchant pre wedding | अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग फंक्शनची चर्चा सध्या सर्वत्र आहे. प्री-वेडिंग फंक्शनमधील कॉकटेल पार्टीमध्ये बॉलीवूड स्टारने धमाकेदार डान्स केला. याच कॉकटेल पार्टीमधील बॉलीवूड स्टार सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांनी पहिल्यांदा स्टेज शेअर केला आणि एकत्र डान्स केला.
आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान याआधी कधीही एकत्र दिसले नव्हते. पण मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनने हा अशक्य क्षणही शक्य करून दाखवला.
तिघेही स्टेजवर आले आणि नाचले. मात्र, याच काळात एक मजेदार घटनाही घडली. खरंतर हे तिघे परफॉर्म करायला आले तेव्हा बॅकग्राउंडमध्ये आरआरआरचं ‘नातू नातू’ गाण्यावर तीनही खानने हुक स्टेप केली. सलमान खान मध्ये तर आमिर-शाहरुख बाजूला होते. नंतर सलमान’जीने के है चार दिन’ गाण्यावर डान्स करतांना दिसतो. आमिर खानच्या ‘मस्ती की पाठशाला’ स्टेपवर हे तिघेही करताना दिसतात.
हा व्हिडीओ पाहून लाईकचा वर्षाव केला आहे. एका यूजरने लिहिले की, ‘हे फक्त अंबानी यांच्या कार्यक्रमात होऊ शकत. तर काहींनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले आहे.
हेही वाचा
भाजपने दिग्गजांना डावललं ; शिवराज सिंह चौहान यांच्याबाबत पक्षाचा ‘हा’ मोठा निर्णय