Shah Rukh Khan on Ram Charan । गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसीय प्री-वेडिंग फंक्शन्सची बरीच चर्चा झाली. या सेलिब्रेशनमध्ये देशातील आणि जगातील सर्व दिग्गज व्यक्तींसह बॉलिवूडपासून ते साऊथ इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली.
यादरम्यान बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी अनेक परफॉर्मन्सही दिले. या सगळ्यात शाहरुख खान या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये साऊथचा सुपरस्टार राम चरण यांचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. रामचरणची पत्नी कोनिडेला उपासना हिच्या मेकअप आर्टिस्टने शाहरुख खानवर हे आरोप केले आहे.
SRK calling Ram Charan and Salman and Aamir joined 🥰🔥pic.twitter.com/BsGbHhOUoW
— Aman (@amanaggar02) March 3, 2024
बॉलीवूडचे तीन खान – शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये स्टेजवर एकत्र परफॉर्म केलं. यादरम्यान तिन्ही खानांनी ‘RRR’ मधील ‘नाटू नाटू’ या ऑस्कर विजेत्या तेलुगू गाण्यावर डान्स केला. मात्र,’नाटू नाटू’ची आयकॉनिक हुक स्टेप तिन्ही खानला करता आली नाही, तेव्हा त्यांनी चित्रपटाचा मुख्य अभिनेता राम चरणला स्टेजवर . यादरम्यान शाहरुख खानने गमतीने राम चरणला ‘इडली-वडा’ म्हटले.
यादरम्यानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेकअप आर्टिस्ट झेबा हसनने तिच्या सोशल मीडिया हँडलवर राम चरणचा अनादर केल्याचा आरोप केल्यावर वाद निर्माण झाला. तिने एक व्हिडिओ क्लिप शेअर केली. त्यासोबत लिहिले आहे कि,’इडली वडा राम चरण, तू कुठे आहेस? त्यानंतर मी बाहेर पडलो. राम चरणी सारख्या तारेला अशी अनादराची वागणूक? मात्र, नंतर त्याने आपल्या इन्स्टावरुन ही पोस्ट डिलीटही केली.’
ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर रामचरणचे चाहतेही बॉलिवूडच्या बादशाहवर नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर शाहरुख खानचे आहेत त्यांची बाजू मांडत आहे.