मुंबई :– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल आणि लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी बुकी अनिल जयसिंघानी याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे. तर अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी गत आठवड्यात अनिल जयसिंघानी आणि त्यांचा चुलत भाऊ निर्मल जयसिंघानीसह अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांची कोठडी संपल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले.
Elections 2024 : तेजस्वी, अखिलेश यादवांनी दिला कॉंग्रेसला सल्ला,म्हणाले “भाजपविरोधात लढण्यासाठी…”
या सुनावणीत विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी कोठडीत आणखी पाच दिवस वाढ करण्याची मागणी केली. मात्र, न्यायालयाने अनिल जयसिंघानीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. तर आरोपी अनिक्षा जयसिंघानीला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.