नवी दिल्ली :- बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कॉंग्रेसला स्वतंत्रपणे; पण एकसारखाच सल्ला दिला आहे. प्रादेशिक पक्षांची ताकद असलेल्या राज्यांत त्यांना भाजपविरोधात लढण्यासाठी झुकते माप दिले जावे, असे त्यांचे म्हणणे आहे.
पुढील लोकसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. त्या निवडणुकीत भाजपचा मुकाबला ताकदीने करण्यासाठी एकत्र येण्याची भूमिका अनेक विरोधी पक्षांनी घेतली आहे. मात्र, संभाव्य आघाडीची रचना, रूपरेषा याविषयी अद्याप अस्पष्टता आहे. त्यामुळे विविध पक्ष आपापली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहेत.
तेजस्वी आणि अखिलेश यांची प्रादेशिक पक्षांविषयीची भूमिका बऱ्यापैकी एकसारखी वाटत आहे. विरोधकांच्या गोटातील कॉंग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष आहे. पण, जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत; तिथे त्यांना ड्रायव्हर सीट दिली जावी, असे तेजस्वी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
Himachal : ‘दिल्ली-धर्मशाला-दिल्ली’ इंडिगो विमान सेवेला प्रारंभ
तर, अखिलेश यांनी लखनौमध्ये पत्रकारांशी बोलताना कॉंग्रेसचा नामोल्लेख टाळून सूचक वक्तव्य केले. प्रादेशिक पक्ष आपापल्या राज्यांत भाजपशी संघर्ष करत आहेत. त्यासाठी राष्ट्रीय पक्षांनी प्रादेशिक पक्षांना पाठिंबा द्यावा, असे त्यांनी म्हटले.