लोणी काळभोर(प्रतिनिधी) – पुण्यातुन कदमवाकवस्ती येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी तीन दिवसापूर्वी दाखल झालेल्या कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कात आलेल्या दोन्ही जावायांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत तर संबंधित महीलेवर उपचार करणाऱ्या खाजगी रुग्णालयातील तीन डॉक्टरांचाही कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने कदमवाकवस्ती येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
दरम्यान संबंधित महीलेच्या दोन्ही जावायांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने, आरोग्य विभागाने संबंधित महिलेच्या जावायांच्या संपर्कात आलेल्या घरातील सर्व नातेवाईकांने कोरोना चाचनी करण्याचा निर्णय रद्द केला असल्याची माहिती लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी दिली आहे.
पुण्यात लोहीयानगर परीसरात राहणारी एक महिला उपचारासाठी तीन दिवसापूर्वी फुरसुंगी फाट्यावरील एका खाजगी रुग्णालयात आली होती. संबंधित महिलेला फुरसुंगी फाट्यावरील खाजगी रुग्णालयात उपचार न झाल्याने, संबंधित महिलेवर पुण्यातील शाशकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान संबंधित महिला कोरोना बाधीत असल्याचे आढळून आल्यामुळे महिलेचे दोन जावाई व खाजगी रुग्णालयातील तीन डॉक्टरांचीही कोरोना टेस्ट केली होती.
कोरोना बाधीत एक डॉक्टर व दोन नर्स असे तीन जण घरी परतले…
दरम्यान उरुळी कांचन येथील कोरोना बाधीत महिलेवर चौदा दिवसापूर्वी लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करणारे एक डॉक्टर व दोन नर्स अशा तीनही जणांची दुसरी कोरोना टेस्ट मंगळवारी (ता. 5) निगेटीव्ह आली आहे.
उरुळी कांचन येथील कोरोना बाधीत महिलेवर उपचार करणारे एक डॉक्टर व दोन नर्स यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. मात्र आज (मंगळवारी) दुसरी टेस्ट निगेटीव्ह आल्याने, वरील तीघांनाही घरी सोडले.