मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘आलिया भट्ट’चा मोस्ट अवेटेड फिल्म ‘गंगुबाई काठियावाडी’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 25 फेब्रुवारी 2022 रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. नुकतंच सिनेमातील ‘ढोलिडा’ हे नवीन गाणं प्रदर्शित करण्यात आलं असून, अभिनेत्री आलीय भट्टवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे.
गाण्यात आलियाचा जबरदस्त डान्स आणि स्टाइल पाहायला मिळत आहे. यात आलिया ही पांढऱ्या रंगाच्या साडीत ढोलच्या तालावर नाचताना दिसत आहे. तिच्या आजूबाजूला अनेक महिला सुद्धा डान्स करत तिला चिअर करत आहेत. सध्या हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं असून, प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात प्रेम मिळत आहे.
दरम्यान, आता ‘ढोलीडा’ या गाण्यावरून आलिया भट्टला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणचा डान्स कॉपी केला असं नेटकरी बोलत आहेत. एका नेटकऱ्याने ‘रामलीला चित्रपटातील गाण्याप्रमाणे सेम डान्स केला आहे.’
अशी कमेंट केली आहे. तर, दुसऱ्या नेटकाऱ्याने ‘दीपिका पदुकोणच्या नगाडा गाण्याप्रमाणेच हा डान्स कॉपी केला आहे. अशी केली आहे. ‘ढोलिडा’ हे गाणे साहिल हाडने संगीतबद्ध केले आहे. तर हे गाणे जान्हवी श्रीमंकर गायले असून कृती महेशने हे गाणे कोरिओग्राफ केले आहे.