महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (दि. 4) उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे बारामती शहरातून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील महापुरुषाच्या पुतळ्यांना अभिवादन करून अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होणार असून उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर कन्हेरी (ता. बारामती) येथे सभा पार पडणार आहे.