हडपसर –आगामी सन २०२७ मध्ये होणाऱ्या स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धाची पहिली निवड चाचणी श्री. शाहु महाराज युनिवर्सिटी कानपूर, उत्तरप्रदेश येथे नुकतीच पार पडली. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांच्या निर्णयावर ही स्पर्धा पार पाडली. या स्पर्धेत हडपसर येथील चितांमणी बाळासाहेब राऊत याने ९३ किलो वजन गटात उत्तम खेळ खेळला आहे.
या गटात संपूर्ण भारतातून एकूण १७ खेळाडू आले होते. मागील स्पेशल ऑलिम्पिकचा विजेता खेळाडू हा देखील यावेळी निवड चाचणीत सहभागी झाला होता. यांच्यासह सर्व सहभागी खेळाडूंना मागे टाकत चितांमणीने स्काॅटमध्ये १६० किलो, बेच मध्ये ८० किलो
डेडलिप्ट मध्ये १६५ किलो उचलून विजय मिळवला. पाॅडेचरीचे प्रशिक्षक टी बाकीराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दोन वर्ष चिंतामणी राऊत हा प्रशिक्षण घेत आहे.
चिंतामणीला या प्रवासात महाराष्ट्राचे स्पेशल ऑलिम्पिक भारताच्या अध्यक्षा मेघा सोमाया संचालक भगवान तलवार, जितेंद्र ढोले , आशोक नांगरे, महाराष्ट्राचे कोच निकीता पराडकर, बाळासाहेब राऊत यांचे मार्गदर्शन मिळाले. चिंतामणी भारतासाठी गोल्ड मेडल आणेल, असा विश्वास पालक व प्रशिक्षक बाळासाहेब राऊत यांच्यासह सर्व चाहत्यांनी व्यक्त केला आहे.
कानपुर उत्तरप्रदेश येथे स्पेशल ऑलिम्पिक भारत आयोजित नॅशनल पाॅवर लिफ्टिंग या स्पर्धात महाराष्ट्रातून चार मुली व पाच मुलांची निवड झाली होती. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने ७ सुवर्ण पदक आणि ७ कांस्य पदक पटकावून महाराष्ट्राचे नाव लैकिक केले आहे. स्पर्धेत चितांमणी बाळासाहेब राऊत हा तीन सुवर्ण पदक मिळवून देशात अव्वल ठरला आहे. चिंतामणी असाच खेळत राहिल्यास आगामी ऑलम्पिक मध्ये तो नक्कीच भारतासाठी गोल्ड आणेल हा विश्वास आहे. – बाळासाहेब राऊत, प्रशिक्षक व चिंतामणीचे पालक