Ajit Pawar on Supriya Sule । विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर नमो रोजगार मेळाव्या आज संपन्न होत आहे. या मेळाव्या गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहे. कारण हा मेळावा बारामती मध्ये होत असून या मेळाव्यामध्ये स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि खुद्द शरद पवार यांनाच निमंत्रण न दिल्यामुळे हा कार्यक्रम राज्यभरात चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांना दोन दिवसांनी निमंत्रण पत्रिका देण्यात आली. त्यावर शरद पवार यांचे नावच नसल्याचे दिसले. तरीही आम्ही कार्यक्रमाला जाणार असल्याची घोषणा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी केली होती.
सुप्रिया सुळे यांनी मंचावर उपस्थित असलेल्या उद्योग मंत्री उदय सामंत आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशीही बातचीत केली. यावेळी त्यांच्याशेजारीच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारदेखील उपस्थित होत्या. मात्र दोघींनीही मंचावर एकमेकांशी बोलणे टाळले.
दरम्यानचा व्हिडिओवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पवार बहीण-भावातल्या ‘त्या’ क्षणाची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.