Devendra Fadnavis । बारामती शहरातील अत्याधुनिक बस स्थानक, पोलीस उप मुख्यालय, पोलीस वसाहत तसेच नमो महा रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, दिलीप वळसे पाटील, उपसभापती नीलम गोरे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, आदी मान्यवर उपस्थित होते.
एकाच मंचावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच दिग्गज उपस्थित असल्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागल आहे. या सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जाणार वाटत होते मात्र, देवेंद्र फडणवीस वगळता कुणीही राजकीय टोलेबाजी केली नाही.
देवेंद्र फडणवीस यांनी भाषणा दरम्यान शरद पवार गटाच्या विरोधात केली नाही तर त्यांनी थेट अजितदादांनाच चिमटे काढले. अजितदादा यांना गृहमंत्रीपद देण्यास जाहीरपणे नकारही दिला. ‘अजितदादा मला हळूच म्हणू शकतात, की पीएमसीच (प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट) का, खातंच माझ्याकडे द्या, पण ते देणार नाही, ते माझ्याकडेच ठेवेन” असं देवेंद्र फडणवीस म्हणताच मंचावर हशा पिकला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बारामती शहराच्या विकासाचे कौतुक केले. बारामती शहरातील बस स्थानक हे एखाद्या विमानतळा सारखे आहे. शहरातील प्रशासकीय व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने सरकारी नसून एखाद्या कार्पोरेट कंपनी सारखी निर्माण करण्यात आली आहेत अजित पवार यांच्या मदतीने राज्यातील पोलीस प्रशासन कार्यालयांचा व निवासस्थानांचा चेहरा मोहरा बदलण्याचा मला देखील मोह होत आहे. अजित पवार यांच्या माध्यमातूनच बारामतीत पश्चिम विभागाचा नमो महा रोजगार मेळावा यशस्वी होत असल्याचे देवेंद्र फडणीस यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
का रे दुरावा? एकाच मंचावर पण… पवार बहीण-भावातल्या ‘त्या’ क्षणाची चर्चा…