पाथर्डी -तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींपैकी बारा ग्रामपंचायती भाजप, दोन राष्ट्रवादी, तर एक उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या ताब्यात गेल्या आहेत. त्यापैकी डांगेवाडी ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाली. उर्वरित 14 ग्रामपंचायतींची मतमोजणी आज (सोमवार) तहसील कार्यालयात पार पडली.
तालुक्यातील चौदा ग्रामपंचायती ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षीय संदर्भापेक्षा स्थानिक आघाडी, व्यक्तिगत उमेदवार यावरच निवडणुकांचे निकाल अवलंबून असतात. तहसील कार्यालयात मतमोजणी आज (सोमवार) पार पडली. तहसीलदार श्याम वाडकर व निवडणूक निर्णय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विजयानंतर विविध गावांतील ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.
विजयी सरपंच व सदस्य या प्रमाणे – साकेगाव – अलका चंद्रकांत सातपुते (सरपंच, भाजप), सदस्य – सतीश सातपुते, निर्मला सातपुते, आशाबाई सातपुते, शाहू बळीद, छाया वाघ, रुकसाना शेख, अजय सातपुते, सुवर्णा तांबे, नवनाथ एकशिंगे, संदीप चव्हाण, हिरा सातपुते. पाडळी – अशोक गर्जे (सरपंच, भाजप), सदस्य – दिलीप कचरे, ज्ञानेश्वर गर्जे, संगीता कांबळे, गणेश कचरे, सुमन पाचरणे, उज्ज्वला तुपे, सुनील साळुंके, सुखमिनी बांगर, मीरा कचरे. ढवळेवाडी – सीमा बाबासाहेब चितळे (सरपंच, भाजप), सदस्य – सचिन पवार, संगीता
दुसंग, मंदाबाई चितळे, दुराजी माने, वैशाली ढवळे, मयूर चितळे, विमल चितळे. हत्राळ – संगीता विष्णू केदार (सरपंच, भाजप), सदस्य – परमेश्वर टकले, पूजा टकले, कविता साळवे, नितीन काकडे, इंदुबाई पटारे, कचरू पटारे, राधाबाई टकले. सैदापूर – दादासाहेब शिवणकर (सरपंच, भाजप) सदस्या – संभाजी केदार, राणी कराड, मीरा केदार, बापू केदार, संगीता दराडे, रामराव केदार, मुक्ता केदार. जवखेडे – चारुदत्त वाघ (सरपंच, भाजप), सदस्य – गणेश कासार, शुभांगी कासार, अमोल वाघ, सुनीता वाघ, शांता आंधळे, इरफान पठाण, कौसाबाई जाधव, वर्षा गवळी, स्वप्नील वाघमारे, विद्या आंधळे. डोंगरवाडी – उद्धव गीते (सरपंच, भाजप), सदस्य – रामकिसन गिते, मालिका गिते, गयाबाई आव्हाड, आदिनाथ गिते, शारदा गिते, अमोल गिते, सीता गिते. चिचोंडी – श्रीकांत आटकर (सरपंच, भाजप), सदस्य – अनिता फुलमाळी, इम्रान शेख, अंबिका दानवे, संदीप गरुड, आसाबाई जऱ्हाड, सपना तुपे, सुदर्शन गायकवाड, वेदना भिंगारदिवे, द्वारकाबाई आव्हाड. करंजी – नसीम रफिक शेख (सरपंच, शिवसेना उद्धव ठाकरे), सदस्य – नवनाथ आरोळे, रूपाली अकोलकर, अलका अकोलकर, सुनील अकोलकर, सुरेखा आहेर,
अर्चना गुगळे, गणेश अकोलकर, विमल अकोलकर, मारुती क्षेत्रे, सविता अकोलकर, अंबादास नजन, अर्जुन अकोलकर, मनीषा भिटे. धारवाडी – तारामती भीमराज सोनवणे (सरपंच, राष्ट्रवादी), सदस्य – बाबासाहेब गवळी, योगिता घुगे, अनिता सोनवणे, रामेश्वर काळापहाड, शीतल शिरसाट, भाऊसाहेब गोरे, स्वाती गोरे. डमाळवाडी – कुसुम अंबादास डमाळे (सरपंच, राष्ट्रवादी), सदस्य – गौतम डमाळे, स्वाती डमाळे, किरण शिरसाट, श्रीकृष्ण डमाळे, पद्म डमाळे, अंकुश सानप, इंदुबाई शिरसाट. रेणुकाईवाडी – संदीप देशमुख (सरपंच, भाजप), सदस्य – प्रदीप निंबाळकर, राणी निंबाळकर, राणी म्हस्के, अजय घोरपडे, जनाबाई कुचे, अरुण झाडे,अलका म्हस्के. दगडवाडी – उषा सुभाष शिंदे (सरपंच, भाजप), सदस्य – अजिंक्य शिंदे, ललिता आंधळे, शोभा काळे, मारुती शिंदे, रतन गायकवाड, भाऊसाहेब शिंदे, साधना शिंदे. गीतेवाडी – कमल रामदास गिते (सरपंच, भाजप), सदस्य – रामेश्वर गिते, प्रियांका पोटे, कमल गिते, प्रकाश पोटे, यमुना पोटे, अमोल गिते, चंद्रभागा पोटे. डांगेवाडी – सोमनाथ अकोलकर (सरपंच, भाजप) बिनविरोध पूर्वीच निवड झाली आहे.
जवखेडे व हत्राळला ट्विस्ट!
जवखेडे ग्रामपंचायतीचे चारुदत्त वाघ सरपंच झाले आहेत. मात्र, अमोल वाघ यांच्या सात जागा आल्या आहेत. बहुमत अमोल वाघ यांच्याकडे आहे. हत्राळला संगीता केदार सरपंच झाल्या आहेत. मात्र, बहुमत विरोधी गटाकडे गेले आहे. दोन्ही गावांत सरपंचपद एकाकडे व बहुमत विरोधकाकडे असे झाले आहे.