पारनेर – तालुक्यातील सात गावांतील ग्रामपंचायतची मतमोजणी प्रक्रिया आज (सोमवार) पार पडली असून, सहा ग्रामपंचायती आ. नीलेश लंके गट, तर एक ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात गेली आहे. तहसीलदार गायत्री सौंदाणे, नायब तहसीलदार गणेश आढारी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आज मतमोजणी प्रक्रिया पार पाडली. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
विजयी सरपंच व सदस्य पुढीलप्रमाणे – कान्हूर पठार – संध्या किरण ठुबे (सरपंच, 1945), सदस्य – ज्ञानेश्वर ठुबे, सतीश ठुबे, मंदा दत्तात्रय सोनावळे, प्रसाद नवले, सविता धनंजय ठुबे, पल्लवी सुशांत ठुबे, श्रीकांत ठुबे, सुनीता गायके, विशाल लोंढे, शारदा वैभव साळवे, धनंजय व्यवहारे, गंगुबाई एकनाथ तांबे, स्वप्नाली दीपक लोंढे. काकणेवाडी – अशोक वाळुंज (सरपंच, 615), सदस्य – संभाजी वाळुंज, पारूबाई रभाजी वाळुंज, वृषाली अनिल वाळुंज, नवनाथ वाळुंज, संगीताविजय वाळुंज, गीताराम वाळुंज, जयश्री अविनाश वाळुंज.
विरोली – शोभा उत्तम गाडगे (सरपंच, 413), सदस्य – लहू बुचडे, जनाबाई काशिनाथ जपे, शुभांगी लहू गाडगे, अमोल मोरे, शारदा साहेबराव मते, पांडुरंग गाडगे, शांताबाई रभाजी भागवत. वाडेगव्हाण –
प्रियांका किशोर यादव (सरपंच, 1498), सदस्य – सुमित सोनवणे, शालन श्रीरंग रासकर, संगीता सुभाष सोनवणे, एकनाथ शेळके, जयश्री बाळू सोनवणे, नंदनी यदू झांबरे, शुभम गाडेकर, चैताली अमोल यादव, तुषार बोरगे, सुजित गवळी, प्रियंका प्रवीण शेळके. जामगाव – पुष्पा बाळासाहेब माळी (सरपंच), सदस्य – गणेश बर्वे, उषा दिलीप पवार, मनीषा सोमनाथ बर्वे, उत्तम चौधरी, अतुल पवार, अनिता सागर माळी, जालिंदर खाडे, शुभांगी यशवंत केदार, बबन मेहेर, शीतल आनंदा भुजबळ, रोहिणी बाळासाहेब खाडे. यादववाडी – राजेंद्र शेळके (सरपंच, 393), सदस्य – अजित ठोंबरे, मीना यादव, सुलभा राजेश यादव, सागर सुनील तरडे. मावळेवाडी – कल्याणी कांतिलाल भोसले (सरपंत, 400) सदस्य – पूजा रवींद्र पाडळकर, अश्विनी विलास थोरात.
बिघाडामुळे निकालास तीन तास उशीर!
कान्हूर पठार ग्रामपंचायत प्रभाग 2मध्ये मतमोजणी मशीनमध्ये तांत्रिक अडचण आल्याने निकालास तीन तास उशीर झाला. तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी आयोगाकडे याबाबत मार्गदर्शन मागितले. त्यानुसार प्रयत्न करूनही मशीनचा डिस्प्ले ओपन होत नव्हता. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या मिशनमार्फत मदत घेतली. 3 तासांनी मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. संध्याकाळी किरण ठुबे यांना 135 मतांनी विजयी घोषित करण्यात आले.