‘कृषी कायद्यांमुळे रेशनवरील धान्य बंद होणार’

कायद्यामागील धोका ओळखावा : मोहन जोशी

पुणे – मोदी सरकारच्या कृषी कायद्यामुळे रेशनवरील धान्य बंद होणार आहे. यातून सामान्य रेशन कार्डधारक, देशातील रेशन दुकानदार यांना फटका बसणार आहे. यामुळे या कायद्यामागील धोका ओळखावा, असे मत माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी सांगितले.

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी एरंडवणा सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने मागील दोन महिन्यांपासून उपक्रम सुरू आहेत. शेतकरी आंदोलकांच्या भावना, लोकांमधून होणारे स्वागत आदी बाबी आठ फूट उंच आणि दहा फूट रुंदीच्या एलईडी टीव्हीच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्‌घाटन जोशी यांच्या हस्ते झाले.

यावेळी दादा जगताप, उमेश कंधारे, उल्हास शिंदे, भगवान कडू, ऍड. शाबीर खान, संजय मानकर, महेश विचारे, दत्ता जाधव, प्रवीण डाबी, सतीश खैरे, अनिल चड्डा, संतोष बाहेती, मंडळाच्या महिला आघाडीच्या प्रमुख सुमंगल वाघ, भारती घारे, हिमाली सडेकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष प्रशांत वेलणकर यांनी केले. चेतन आगरवाल यांनी सूत्रसंचालन यांनी केले. तर, आभार उदय लेले यांनी मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.