#Budget2021 : बजेटबाबतच्या प्रतिक्रियांचा सोशल मीडियावर ‘धुमाकूळ’

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2021 -22 या वर्षासाठीचा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सोमवारी (दि. 1) संसदेत सादर केला आहेत. अर्थसंकल्प “कधी नव्हे इतका चांगला’ असणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देत सर्वसामान्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी त्या काय करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अश्यातच सोशल मीडियावर लोकांनी बजेटबाबत आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. कोरोनामुळे आधीच हैराण झालेल्या जनतेला या बजेटकडून खूप अपेक्षा आहेत. सध्या सोशलवर #Budget2021 ट्रेन्ड जोरदार होत आहे. सध्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादरीकरणास सुरुवात झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.