पुणे: पीएमपी ग्रुप पुणे यांच्या वतीने आयोजित एचकेसी 14 वर्षाखालील करंडक क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत राज मिश्राने हॅट्ट्रिकसह घेतलेल्या 8 बळींच्या जोरावर एजीपी ग्रुप संघाने केम्ब्रिज क्रिकेट अकादमी संघाचा 7 गडी राखून दणदणीत पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
या सामन्यात उपांत्यपूर्व फेरीत राज मिश्रा (8-15) याने केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे केम्ब्रिज क्रिकेट अकादमी संघाचा डाव 17.2 षटकात 35 धावावर संपुष्टात आला. एजीपी ग्रुप संघाने हे आव्हान 6.5 षटकात 3 बाद 39 धावा करून पूर्ण केले.
सविस्तर निकाल
उपांत्यपूर्व फेरी – केम्ब्रिज क्रिकेट अकादमी – 17.2 षटकात सर्वबाद 35. (साहिल कळसेकर 11, राज मिश्रा 8-15, यश महानवर 1-3, हर्ष पाष्टे 1-3) पराभूत वि. एजीपी ग्रुप – 6.5 षटकात 3 बाद 39. (यश महानवर 23, ओम मिश्रा 2-10, प्रफुल कानडे 1-13)