पिंपरीत अनेक दिवसांनंतर रुग्णवाढ हजाराच्या आत

पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून रोज एक हजाराहून अधिक करोनाबाधित रुग्ण आढळत होते. शुक्रवारी आणि शनिवारी रुग्णवाढीचा उच्चांक झाला होता. त्यानंतर सोमवारी मात्र अनेक दिवसांनंतर रुग्णवाढीचा आकडा एक हजारांच्या खाली उतरला आहे.

सोमवारी सायंकाळी महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार गेल्या 24 तासांमध्ये शहरातील 760 आणि शहराबाहेरील 61 जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये करोनाने 23 रुग्णांचा बळी घेतला आहे. त्यापैकी 17 शहरातील रहिवासी होते, तर सात रुग्ण हे बाहेरुन शहरात उपचारासाठी आले होते.

सोमवारी वाढ झालेल्या 760 रुग्णांमुळे शहरातील आतापर्यंतची एकूण करोनाबाधितांची संख्या 64382 इतकी झाली आहे. तसेच शहरातील 1056 आणि शहराबाहेरील 297 अशा एकूण 1353 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आणि कोविड सेंटरमध्ये 6429 रुग्ण दाखल आहेत. तर शहराबाहेरील 1225 रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आणि कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. सोमवारी सुमारे 2010 रुग्णांचे अहवाल प्रलंबित होते. तसेच सोमवारी 459 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 53591 रुग्णांना बरे करून घरी पाठविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.