मेष : महत्त्वाकांक्षी योजना हाती घ्याल. वृषभ : आर्थिक स्थिती चांगली राहील, देणी देता येतील. मिथुन : प्रयत्नाशिवाय फळ नाही हे लक्षात येईल. कर्क : कामात बदल आवश्यक, महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. सिंह : नवीन कामे मिळतील, डोक्यावरचे ओझे खांद्यावर येईल. कन्या : कामात अनुकूल बदल घडतील. तूळ : नोकरीत अनपेक्षित फायदा मिळेल. वृश्चिक : कामे पूर्ण झाल्याने मानसिक समाधान लाभेल. धनु : प्रगतीसाठी नवीन संधी चालून येतील. मकर : व्यवहारीदृष्टिकोन लाभदायक ठरेल. कुंभ : व्यवसायात इतरांना न जमणारी कामे पार पाडाल. मीन : तडजोडीचे धोरण भविष्यात लाभदायक ठरेल.