पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अमेरिकेचा ३ दिवसीय दौरा आटोपला आहे. या दौऱ्यादरम्यान ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी पंतप्रधानांचे कौतूक करत आपण त्यांचे फॅन झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. एवढेच नाही तर त्यांनी मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेचेही कौतुक केले.
29 जून रोजी मॉस्को येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना पुतिन यांनी आपण मोदींचे फॅन झालो असल्याचे म्हटले. तसेच आमचे मित्र आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी मेक इन इंडिया संकल्पना सुरू केली. ज्याचे खूप चांगले परिणाम मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वकांक्षी योजना ‘मेक इन इंडिया’ची जादू संपूर्ण जगावर दिसत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्री सर्वांना माहिती आहे.
When Putin gives example of Prime Minister Modi’s ‘Make in India’ and the impact it has had on India’s economic fortunes… pic.twitter.com/JnqE7sXvRw
— Amit Malviya (@amitmalviya) June 29, 2023
व्लादिमीर पुतिन यांनी मॉस्को येथे एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या ‘मेक इन इंडिया’चे कौतुक केले आहे. मेक इन इंडियाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम झाल्याचे ते म्हणाले. रशियन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी रशियातील देशांतर्गत उत्पादने आणि ब्रँडला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडियाचे उदाहरण झाले आहे.
रशिया-युक्रेन युद्ध अद्यापही सुरूच आहे. यामुळे रशियाला मोठ्या प्रमाणात कठोर आर्थिक निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. या निर्बंधांमुळे व्यवसायांसाठीच्या बाजारपेठा बंद असल्याने रशियाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी भारताच्या ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर रशियात स्वदेशी उत्पादनांवर भर देण्यात यावा आणि आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देशातच तयार करण्याचे पुतीन यांनी आवाहन केले आहे.
देशातून पाश्चिमात्य कंपन्या निघून गेल्याने रशियन उद्योजकांच्या संधी वाढल्या आहेत.त्यामुळे देशांतर्गत ब्रँडला प्रोत्साहन देण्यासाठी रशियाला नवीन धोरणाची गरज आहे. रशियाचे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी ही संकल्पना मांडली. ‘मेक इन इंडिया’चा भारतीय अर्थव्यवस्थेवर अतिशय चांगला परिणाम झाला आहे असे पुतीन यांनी म्हटले.