मुंबई – मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ‘ऐश्वर्या नारकर’ नेहमीच साध्या लुकमध्ये असते. मात्र याच साध्या लुकमधील साडीलुकसुद्धा प्रेक्षकांना भुरळ घालणारा आहे. काही दिवसांपूर्वी तिने साडीमध्ये क्लासिक फोटोशुट केलं होती यामध्ये सिंपल लुकमध्ये ती प्रचंड खुलून दिसत होती. खरंतर साडीलुकमध्ये ‘ऐश्वर्या नारकर’ नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत आली आहे.
View this post on Instagram
वयाची ५० वर्ष पार केल्यानंतरही त्यांनी त्यांचा फिटनेस जपला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये कायम त्यांच्या फिटनेसची आणि सौंदर्याची चर्चा होते. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर ही मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणून ओळखली जाते. ऐश्वर्या आणि अविनाश यांच्या पर्सनल लाइफविषयी फार मोजक्या जणांना माहित आहे.
View this post on Instagram
ऐश्वर्या नारकर यांना एक मुलगादेखील आहे. मात्र, तो कलाविश्वापासून दूर असल्याचं सांगण्यात येतं. त्यांच्या मुलाचे नाव अमेय नारकर असून तो आई-वडिलांइतकाच दिसायला स्मार्ट आहे. अमेय सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा तो त्याचे फोटो शेअर करत असतो.
दिसायला अतिशय देखणा असलेला अमेय भविष्यात कलाक्षेत्रात आल्यास वावगे ठरायला नको. अमेय नारकर सिंगल नसून त्याला गर्लफ्रेंड देखील आहे. आज याच कारणामुळे अमेय सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. तृशाला नायक असे त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव असून ‘मास्टर्स इन पब्लिक रिलेशन्स’ ही पदवी तिने प्राप्त केली आहे. अनेकदा नारकर कुटुंबासोबतचे तृशालाचे फोटो याचकारणामुळे चर्चेत येत आहेत. अमेय आणि तृशाला हे दोघे खूप वर्षांपासूनचे मित्र आहेत.