#ICCWorldCup2019 : विश्वचषकात ऑस्ट्रेलिया-आफगाणिस्तान आमनेसामने

स्मिथ-वॉर्नरच्या पुनरागमनावर लक्ष; रशिदच्या फिरकीचे कोडे सोडवण्यासाठी रणनितीची गरज

लंडन – पाच वेळा विश्‍वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघासमोर आज कडव्या अफगाणिस्तानचे आव्हान असुन आजच्या सामन्यातुन स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत संघाकडून पुनरागमन करणार आहेत.

चेंडू छेडछाडा प्रकरणी राष्ट्रीय संघातून सुमारे एक वर्षापासुन बाहेर असलेल्या या दोन्ही फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन संघाने स्पर्धेपुर्वी खेळलेल्या अनऑफिशियल सराव सामन्यांमध्ये संघाकडून पुनरागमन केले होते. मात्र, त्यातील पहिल्या सामन्यात वॉर्नरला चमकदार कामगिरी करण्यात अपयश आले आणि दुसऱ्या सामन्यात तो जायबंदी असल्याने संघाबाहेर होता. तर, स्टिव्ह स्मिथने दोन्ही सराव सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली होती. ज्यात त्याने दुसऱ्या सराव सामन्यात शतकी खेळी करत आपण या स्पर्धेसाठी तयार असल्याचे दाखवून दिले आहे.

स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर बंदीची कारवाई झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ आपला सर्व फॉर्मच गमावून बसला होता. सर्वच संघात एकप्रकारे खळबळ माजली होती. संघाला नेतृत्त्वापासुन सर्व नविन जुळवणी करत विश्‍वचषकापुर्वी संपुर्ण तयारी करायची होती. या दोघांच्या बंदीच्या काळात ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व ऍरोन फिंचने समर्थपने सांभाळले. फिंचने या काळात संघाला पुनरागमनासाठी प्रेरित करत संघामध्ये असलेली पराभवाची मानसिकता पुसण्यास भाग पाडले. त्यामुळे विश्‍वचषकापुर्वीच ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा लईत परतला.

ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला भारतीय भुमीत येऊन एकतर्फी पराभुत केले तर पाकिस्तानला व्हाईटवॉश देत आपण या स्पर्धेच्या दृष्टीने संपुर्णपणे तयार असल्याचा मॅसेज इतर संघांना दिला. त्यात आता या संघाकडून त्यांचे दोन महत्वपुर्त्ण खेळाडू पुनरागमन करत असुन ही त्यांच्यासाठी जमेची बजु ठरणार आहे.

तर, दुसरीकडे नवख्या असणाऱ्या अफगाणिस्तान संघाने गत काही काळात आपल्यात केलेल्या सुधारणांमुळे हा संघ खुप धोकादायक वाटत आहे, याचा प्रत्यय त्याणी विश्‍वचषकापुर्वी झालेल्या सराव सामन्यांमध्ये पाकिस्तानचा पराभव करत दाखवून दिला आहे. अफगाणिस्तानच्या संघाची जमेची बाजु म्हणजे त्यांची गोलंदाजी असुन त्यांच्याकडे उत्कृष्ठ फिरकी गोलंदाज आहेत. ज्यांच्यासमोर चांगले चांगले फलंदाज आपला फॉर्म गमावून बसतात.

मात्र, त्यांच्याकडी वेगवान गोलंदाजांची फळी कुमकुवत असुन संघातील एक दोन फलंदाज वगळले इतर फलंदाज केवळ हजेरीवीराची भुमिका बजावतात. त्यामुळे त्यांना अनेकवेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. जर अफगाणिस्तानला या स्पर्धेत खळबळजनक निकालाची नोंद करायची असेल तर त्यांना आपल्या फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

अफगाणिस्तान – गुलाबदीन नईब (कर्णधार), आफ्ताब आलम, अझगर अफगाण, दौलत झारदान, हमीद हसन, हशमतुल्ला शाहिदी, हझरतुल्ला झईझई, मोहम्मद नबी, मोहम्मद शहझाद (यष्टीरक्षक), मुजीब उर रहमान, नजीबुल्ला झाद्रान, नूर अली झाद्रान, रहमत शाह, रशीद खान, समीउल्ला शिनवारी.

ऑस्ट्रेलिया – ऍरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, जेसन बेहनड्रॉफ, अलेक्‍स केरी (यष्टीरक्षक), नॅथन कोल्टिअर नील, पॅट कमिन्स, नॅथन लायन, ग्लेन मॅक्‍सवेल, केन रिचर्डसन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोईनिस, ऍडम झंपा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.