#ICCWorldCup2019 : विश्‍वचषक आणि भारत

क्रिकेट विश्‍वासाठी मेजवानी असणाऱ्या 12 व्या विश्‍वचषक स्पर्धेला इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने सुरूवात झाली. अपेक्षेप्रमाणे संभाव्य विजेता समजल्या जाणाऱ्या इंग्लंडने पहिल्या सामन्यात आफ्रिकेचा एकतर्फी पराभव करत स्पर्धेचे उद्‌घाटन थाटात केले आहे. मात्र, विश्‍वचषक स्पर्धा सुरू होण्याच्या महिनाभरापासुन क्रिकेट फिव्हर सगळीकडे चढलेला पाहायला मिळत होता. त्याचाच प्रत्यय इंग्लंड येथे झालेल्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात जाणवला.

यंदाच्या स्पर्धेचे उद्‌घाटन पारंपारीक पद्धतीने न करता वेगळी पद्धत अवलंबून लंडन मॉल येथे झाला. या सोहळ्याने अनेकांना निराश केले असले तरी यामुळे अनेकांना अशा प्रकारच्या सोहळ्यास थेट हजेरी लावता आली हे विशेष. आतापर्यंतच्या सोहळ्यांमध्ये लेझर शो, सेलिब्रीटींचे परफॉर्मन्स अशे कार्यक्रम केले जायचे. मात्र, यंदाच्या सोहळ्यात विश्‍वचषकात खेळनाऱ्या संघातील एक माजी खेळाडू आणि एक प्रतिनिधी बोलावत क्रिकेटबद्दल त्यांचे मत विचारले गेले आणि क्रिकेटचा प्रसार कसा केला जावा या बद्दलही चर्चा घडवून आल्या.

सर्वात विशेष बाब म्हणजे या सोहळ्यास उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांपैकी जवळपास 50 टक्‍के प्रेक्षक हे भारतीय होते. तर, इतर प्रेक्षकांमध्ये 10 टक्‍के प्रेक्षक हे आशिया खंडातील अन्य देशातील म्हणजेच पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेतील होते. त्यावरुन आपल्या देशातील क्रिकेट फिव्हर लक्षात येतो. यंदाच्या विश्‍वचषकात भारताचा पहिला सामना 5 जुन रोजी असला तरी आता पासुनच भारतीय प्रेक्षक आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी तयारी करताना दिसत आहेत, ज्यात बंगळुरू येथे तर क्रिकेट रसिकांनी भारतीय संघ विश्‍वचषक जिंकावा यासाठी हवन केले.

तर, मुंबई येथे रसिकांनी आपल्या केसांची ठेवन विश्‍वचषकाप्रमाणे करुन घेतली आहे. यावरुन भारतातील क्रीडा रसिंकाची क्रेझ लक्षात येते आहे. त्याच बरोबर भारतीय प्रेक्षक इंग्लंडच्या भुमीवर देखील आपल्या संघाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी पोहोचले असुन भारत आर्मीच्या शिर्शका खाली ते प्रत्येक सामन्यासाठी संघाचे मनोबल वाढवण्यास मैदानात उपस्थित राहाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)