#ICCWorldCup2019 : विजयारंभास न्यूझीलंड उत्सुक; श्रीलंकेविरूध्द होणार लढत

न्युझीलंड विरुद्ध श्रीलंका
सामन्याचे ठिकाण – सोफिया गार्डन्स, कार्डिफ
सामन्याची वेळ – दुपारी 3.00 वा

लंडन – दिग्गज खेळाडूंनी अचानकपणे जाहिर केलेल्या निवृत्तीमुळे गत दोन ते तीन वर्षांपासुन समतोल संघ निवडण्यासाठी झगडत असणाऱ्या श्रीलंकेसमोर गत वर्षीस्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या न्युझीलंडचे दमदार आव्हान असुन स्पर्धेची सकारात्मक सुरूवात करण्यास न्युझीलंडचा संघ उत्सुक असुन पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर पडण्यास श्रीलंकेचा संघ आज प्रयत्नशील असनार आहे.

गत वर्षी पहिल्यांदाच अंतिम फेरीत स्थान मिळवणाऱ्या न्युझीलंडच्या संघाला यंदाचे विजेतेपद पटकावू शकणाऱ्या संघाच्या यादीत स्थान असुन यंदा त्यांनी समतोल संघ स्पर्धेत उतरवला असुन धडाकेबाज सलामीवीर संयमी मधली फळी आणि गुणवान अष्टपैलूंचा त्यांच्या संघात भरणा आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात त्यांचे पारडे जड वाटत आहे.

तर, दुसरीकडे श्रीलंकेचा संघ गत काही काळापासुन खराब स्थितीतून जात आहे. संघातील पहिल्या फळीतील खेळाडूंनी अचानकपणे निवृत्ती स्विकारल्यानंतर दुसऱ्या फळीतील गुणवान खेळाडूंचा असणारा अभाव हा त्यंच्या संघाच्या खराब फॉर्मसाठी कारणीभुत ठरला आहे. त्यामुळे निवृत्ती पत्करल्यानंतरही गुणवान गोलंदाजांचा अभाव असल्या कारणाने लसिथ मालिंगाला आपली निवृत्ती मागे घेत राष्ट्रीय संघातुन खेळावे लागत आहे. त्यातच श्रीलंकेचा फलंदाजी विभाग अँजेलो मॅथ्युज, कुशल परेरा आणि कुशल मेंडिस यांच्यावरच संपुर्णपणे अवलंबुन असल्याने त्यांना फलंदाजी विभागात बरीच सुधारणा करावी लागणार आहे.

आजच्या सामन्यात न्युझीलंडचा संघ केन विल्यम्सन, मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, टॉम लॅथम, कॉलिन डी ग्रॅंडहोम, टॉम ब्लंडेल सारखे फलंदाज आहेत. तर, ट्रेंट बोल्ट, मिचेल सॅंटनर, इश सोधी, टीम साऊदी सारखे गोलंदाज असल्याने श्रीलंकेच्या संघापेक्षा न्युझीलंडचा संघ आजच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी मजबूत संघ समजला जातो आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

न्युझीलंड – केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लॅथम, कॉलिन डी ग्रॅंडहोम, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्तील, मॅट हेन्री, कॉलिन मुन्रो, जेम्स नीशाम, हेन्री निकोल्स, मिचेल सॅंटनर, इश सोधी, टीम साऊदी.

श्रीलंका – दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), धनंजय डि सिल्व्हा, नुवान प्रदीप, अविष्का फर्नांडो, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, कुशल मेंडिस, जीवन मेंडिस, कुशल परेरा, थिसारा परेरा, मिलिंदा सिरीवर्धने, लहिरु थिरिमाने, इसरु उडाना, जेफ्री व्हॅंडरसे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)