नगर -रात्रीच्या वेळी पाटेगाव शिवारात (ता.कर्जत) रस्ता अडवून लुटमार करणारे दोघे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकान जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शाहुराज बाबासाहेब कोकरे (वय-20, रा. घाटापिंपरी, ता आष्टी जि. बीड), गणेश बाळासाहेब महारनोवर, (रा. दिघी, ता. कर्जत, जि.अ.नगर), यांना ताब्यात घेतले आहे. तर योगेश देवराव गोयेकर, (रा. गोयेकरवाडा, ता. कर्जत, जि. अ.नगर), नाथा शिरगिरे, (रा. जामखेड, हे अद्यापही फरार आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना कोकरे व त्याचे साथीदाराने रात्रीच्या वेळी रस्ता अडवून प्रवाशांना लुटमार केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसर गणेश इंगळे, दत्ता गव्हाणे, बाळासाहेब मुळीक, रविंद्र कर्डीले, सचिन अडबल , दीपक शिंदे, रणजीत जाधव, प्रकाश वाघ, रोहीत मिसाळ, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर यांच्या पथकाने कर्जत येथे सापळा रचवून आरोपीस ताब्यात घेतले.