पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी) शिवशाही बसचा कात्रज घाटात 50 फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात एक प्रवासी मृत्युमूखी पडला असून एका प्रवाशाची प्रकृती गंभीर असल्याचे, एस.टी प्रशासनाने सांगितले आहे.
पुण्याहून सांगलीच्या दिशेने जात असताना ही बस कात्रज घाट ओलांडून शिंदेवाडीनजीक असलेल्या वळणावर दरीत कोसळली. बसमध्ये 28 ते 30 प्रवासी होते.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, पोलीस व स्थानिक नागरिकांकडून बचाव कार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे, प्रशासनाने सांगितले आहे.