पुणे : पत्नीसोबत फोनवर भांडण झाल्याने मनोरुग रेल्वे थेट रेल्वेच्या छतावर चढला. मात्र रेल्वे पोलिसांनी यशस्वीरित्या त्याला खाली उतरवले आहे. सदरचा व्यक्ती मूळचा बिहारचा असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. संजय कुमार दरोगी शर्मा (वय 28) सदरील व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणाचा अधिकचा तपास पुणे रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे. रेल्वे स्थानकाच्या एफओबीवर (फुट ओव्हर ब्रिज, पादचारी पूल) मनोरुग्ण चढला होता. परंतु त्याला रेल्वे पोलिसांनी खाली उतरवले. ही घटना नव्याने उभारण्यात आलेल्या पादचारी पुलावर घडलेली आहे. या पुलाला लागूनच मेट्रोचे नवीन स्थानक आहे. त्यातून अथवा रेल्वेच्याच परिसरातून हा व्यक्ती वरती चढल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
याबाबत लोहमार्ग पोलीस अधिकारी म्हणाले, सदरील व्यक्तीला आमच्या कर्मचाऱ्यांकडून खाली उतरवण्यात आले असून, त्याची सखोल विचारपूस करण्यात येत आहे. या व्यक्तीकडून खाली उतरण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. त्याची चौकशी सुरू आहे. मात्र सदरील व्यक्ती उडवा उडवीची उत्तर देत आहे. त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांना बोलवण्यात आले असून त्याच्याकडूनही या युवकाची चौकशी केली जात आहे. तसेच त्याच्या नातेवाईकांना पुण्यात बोलून घेतले आहे.
दरम्यान, मागील काही महिन्यांपूर्वी असाच एक मनोरुग्ण एका रेल्वे गाडीवर चढला होता. त्यावेळी विद्युत तारांचा शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला होता. अशा मनोरुग्णांना रोखण्यासाठी रेल्वे कडून काय ठोस उपाययोजना केल्या जातात? असा सवाल रेल्वे प्रवाशांकडून केला जात आहे.