नवी दिल्ली : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू साईना नेहवालने आगामी प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या पाचव्या मोसमातून माघार घेत असल्याचे रविवारी ट्विटव्दारे जाहीर केले आहे. प्रीमियर लीगचा लिलाव मंगळवारी दिल्लीत होणार असून लीगचा पाचवा मोसम २० जानेवारी सुरू होईल, त्याआधी तिने आपला निर्णय जाहीर केला आहे.
साईनाने ट्टविट करताना म्हटले आहे की, ” पँक्रिएटिसचा आजार आणि दुखापतींमुळे हे वर्ष कठीण गेले आहे. त्यामुळे पीबीएलमधून माघार घेऊन त्या कालावधीत भविष्यातील महत्वाच्या स्पर्धांसाठी तयारी करणार अाहे.” असे सांगतानाच या लीगमध्ये खेळणार नसल्याबदल तिने चाहत्यांची माफी देखील मागितली आहे.
Hey everyone , I won’t be part of the PBL Season 5 . I haven’t been well most part of the year due to pancreatitis and injuries and I would like to take time during the PBL to prepare better . I want to say sorry to all my fans and I hope to be part of the next season of PBL .
— Saina Nehwal (@NSaina) November 24, 2019
दरम्यान, साईना हिने कोरिया ओपन स्पर्धेतूनही दुखापतीमुळे माघार घेतली होती. तसेच नुकत्याच पार पडलेल्या हाँगकाँग स्पर्धेत साईनाला पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. तेव्हापासून तिने अद्याप एकही लढत खेळलेली नाही. आता तिने प्रीमियर बॅडमिंटन लीगमधूनही माघार घेतली आहे.