Mumbai Pune Expressway | जर तुम्ही आज मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गुरूवार, 23 मे रोजी महामार्गावर आज पुन्हा एक तासाचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान एक्स्प्रेसवेच्या पुणे ते मुंबई मार्गावर वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा उपकरणं बसवण्याचे काम केले जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानुसार, हा ब्लॉक दुपारी 12 ते 1 दरम्यान असणार आहे. या कालावधीत एक्स्प्रेस वेवरील वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहतील. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
पर्यायी मार्ग उपलब्ध Mumbai Pune Expressway |
गुरुवारी दुपारी महामार्गावर गॅन्ट्री बसवण्याचे काम सुरू होईल. त्यामुळे मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या व जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येईल. या कालावधीत वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
– त्यानुसार, पुण्याहून मुंबईकडे द्रुतगती मार्गाने येणारी हलकी वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने मुंबईच्या दिशेने वळवण्यात येतील.
– तर खोपोली एक्झिटमधून बसेस जुन्या महामार्गावरून खोपोली शहराच्या दिशेने शेडुंग टोलनाका मार्गे आणि अवजड वाहनं वळवण्यात येतील.
– खालापूर टोलनाक्यावरून वाहनं द्रुतगती मार्गानं मुंबईकडे वळवली जाऊ शकतात. Mumbai Pune Expressway |
हेही वाचा:
‘आचारसंहिता शिथिल करा, म्हणजे …’ ; शिंदे सरकारने निवडणूक आयोगाला का केली विनंती? वाचा सविस्तर