Pune Porsche Car Accident On Ketaki Chitale| पुण्यातील कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघाताच्या घटनेने राज्यभरात खळबळ निर्माण झाली आहे. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा दारू पिऊन गाडी चालवत होता. यात दोन जणांचा मृत्यू झाला.
शनिवारी रात्री झालेल्या अपघातानंतर अवघ्या 15 तासांच्या आतमध्ये त्याचा सशर्त जामीन मंजुर झाल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले. अनेकांनी पोलिस यंत्रणेसह राज्य सरकारवर संताप व्यक्त केला. यानंतर आता या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्री केतकी चितळे एक व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
केतकीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये केतकीने पोलिस यंत्रणेवर टीका केली आहे. यात ती म्हणते की, “ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि त्या अल्पवयीन मुलाची काही चूक नव्हती, असा पोलिसांनी प्लॅन करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांचा हा प्लॅन फसला. पोलीस महानालायक असतात हे आपल्याला माहित आहे.”
View this post on Instagram
तसेच तिने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती अल्पवयीन मुलाने 48 ते 50 हजारांचे बिल केल्याने त्याने किती दारू प्यायली असेल याचा अंदाज येत असल्याचे म्हंटले आहे. दरम्यान, केतकीने तिच्या लेट्स टॉक या युट्यूब चॅनलवर देखील एक व्हिडीओ शेअर केला आहे. Pune Porsche Car Accident On Ketaki Chitale|
या व्हिडीओच्या माध्यमातून केतकीने पुण्यातील अपघाताबाबत तिचं सविस्तर मत व्यक्त केले आहे. यामध्ये ती म्हणाली, “जे लोक या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे करण्यासाठी गेले होते, त्यांनाच पोलिसांनी अरोपीच्या पिंजऱ्यात टाकलं, ही गोष्ट नवीन नाही. माझ्यावर तर डायरेक्ट डेथ थ्रेट देण्यात येत होते.’ दरम्यान, केतकीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला असून, काहींनी तिच्या वक्तव्याचे समर्थन देखील केले आहे.
हेही वाचा:
अग्रवाल आणि पवार कुटूंबाचे संबंध म्हणूनच सुप्रिया सुळे गप्प ? भाजप नेत्याची टीका