गाडी खरेदी विक्रीच्या व्यवहारातून एजंटाचे अपहरण

पुणे – गाडी खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून एका एजंटचे पिता-पुत्रांनी अपहरण केले. याप्रकरणी पिता-पुत्रासह इनोव्हा गाडीच्या चालकाविरुध्द मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

श्रीकांत बसप्पा कुंभार(25,रा.जत, सांगली), बसप्पा कुंभार(55) व इनोव्हा गाडीचा चालक असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अपहरण करण्यात आलेल्या रविकांत मोरे(45,रा.शिवदर्शन) यांच्या पत्नीने फिर्याद दिली.

रविकांत मोरे यांनी कुंभार यांच्या आयशर टेम्पोचा तोडकर नावाच्या व्यक्तीबरोबर व्यवहार केला होता. हा व्यवहार 4 लाख 30 हजाराला झाला होता. यातील सव्वा तीन लाख रुपये कुंभार यांना येणे होते. या राहिलेल्या व्यवहाराच्या रकमेवरुन कुंभार पिता-पुत्र गुरुवारी दुपारी रविकांत मोरे यांना भेटायला आले होते. तेथे त्यांच्यामध्ये राहिलेल्या पैशावरुन वाद झाला.

यानंतर कुंभार पिता-पुत्रांनी रविकांत मोरे यांना हाताने मारहाण करुन धक्काबुक्की करत इनोव्हा गाडीत कोंबले. व्यवहार झालेल्या तोडकरकडे चल म्हणत त्यांना जबरदस्तीने गाडीत घालून नेले. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक कदम करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.