पुणे – किरकोळ कारणावरुन दोघा भावांवर हल्ला करत एकावर कोत्याने वार करण्यात आले. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिसांनी दोघा सख्ख्या भावांना अटक केली आहे. ही घटना पाषाण येथील सोमेश्वरवाडीत बुधवारी रात्री घडली.
गौरव संभाजी काकडे(28) व शुभम संभाजी काकडे(26) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विक्रम प्रल्हाद राखसपरे यांनी फिर्याद दिली आहे.
घटनेच्या दिवशी फिर्यादी विक्रम व विलास राखपाखरे यांनी आरोपी गौरवला व शुभमला आरडाओरडा करत शिवीगाळ करु नकोस असे सांगितले. याचा राग मनात धरुन दोघेही आरोपी कोयते घेऊन त्यांच्या अंगावर धाऊन आले. यातील गौरवने फिर्यादी विक्रमच्या डोक्यावर कोयत्याने वार केला.
मात्र विक्रमने तो हाताने अडवल्यावर त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तर शुभमने विक्रम व विलास यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.