गुवाहाटी : आसूचे प्रमुख सल्लागार समुज्जल भट्टाचार्य आणि सरचिटणीस लुरींज्योती गोगोई यांना सोमावारी पोलिसांनी अटक केली. त्यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आसूच्या तीन दिवसीय सत्याग्रहाला सोमवारी सुरवात झाली. लाटाशील मैदानानवर कार्यकर्त्यांना नेत्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आम्हाला अटक होऊ शकते, अशी आम्हाला आधी माहिती होती. पण आमची मागणीच अशी होती की का कायदा रद्द करा किंवा आम्हाला अटक करा, असे भट्टाचार्य यावेळी म्हणाले.
त्यांनी दोन दोनच्या रागेने शांततामय पध्दतीने निदर्शने करण्याचे आवाहन केले होते. हा मोर्चा दिघालीपुखुरी भागात पोहोचला त्यावेळी त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले. आसूच्या नेत्यांनी स्वत:हून अटक करवून घेतली. मात्र त्यांची आता मुक्तता करण्यात आली आहे.
दिघालीपुखुरी भागातील एका शेतात त्यांना ठेवण्यात आले. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, वकील, डॉक्टर्स, साहित्यिक, गायक संगितकात आणि अभिनेते या निदर्शनात सहभागी झाले होते.