शरद पवार यांनी दिले आश्वासन
वाघळवाडी- बारामतीच्या ग्रामीण भागामधे क्रीडा संकुलाच्या सुविधा नसतानाही अनेक क्रीडापटुनी आंतरराष्ट्रीयस्तरावर बारामतीचे नाव नेले आहे. याचा अभिमान असून बारामतीच्या पश्चिम भागात क्रीडा संकुलासाठी मंत्रिमंडळ विस्तारानंतर क्रीडा मंत्र्यांशी बोलुन योग्य ते प्रयत्न करू, असे आश्वासन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिले.
सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, आंतरराष्ट्रीय धावपटू जगन्नाथ लकडे, सोमेश्वर स्पोर्ट्स ऍकॅडमीचे सचिव ऍड. गणेश आळंदीकर, अध्यक्ष भाऊसो लकडे, आजी-माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, कार्याध्यक्ष अनिल शिंदे, ऍड. नवनाथ भोसले, युवराज खोमणे, नवीद पठाण आदींनी सोमेश्वर परिसरात क्रीडा संकुलाची आवश्यकता असलेबद्द्ल पवार याना माहीती दिली. क्रीडा संकुलाला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना जागा उपलबध करून देवु शकेल, अशी माहिती पुरुषोत्तम जगताप यांनी पवार यांना दिली. यावेळी पवार यांनी कोणकोणत्या प्रकारच्या मैदानाची व साधनांची आवश्यकता आहे, याबद्दल सविस्तर माहीती घेतली व नवीन क्रीडा मंत्री यांना आपण शासकीयस्तरावर काय मदत करता येईल, याबाबत चर्चा करुन सोमेश्वर परिसरात क्रीडा संकुलासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले.