आमिर खानच्या आगामी “कोई जाने ना’मधील “हर फन मौला’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले. याच्या लक्षवेधक संगीताबरोबरच आमिर आणि अली अवराम या जोडीतील रोमॅंटिक केमिस्ट्रीमुळेही हे गाणे बहारदार बनले आहे. बुधवारी या सिनेमाशी संबंधित टीमला एक छोटीशी पार्टी दिली गेली. त्यावेळी या रोमॅंटिक ड्रामाची मजा प्रत्यक्ष पहायला मिळाली. कॅब्रे स्टाईलच्या “हर फन मौला’ या गाण्यामुळे पार्टीतील रंगत आणखीनच वाढली.
View this post on Instagram
आमिर आणि अली अवराम हे दोघेही “कोई जाने ना’मध्ये अगदी विशेष भूमिकेत दिसणार आहेत. 2018 मधील “ठग्ज ऑफ हिंदुस्थान’नंतर आमिर खानने दुसऱ्या सिनेमात काम केलेले नव्हते. “ठग्ज…’ सुपर फ्लॉप ठरल्यावर आमिरने थोडा काळ विश्रांती घेऊन मग “लालसिंग चढ्ढा’च्या कामा सुरुवात केली.
View this post on Instagram
आता “लालसिंग चढ्ढा’च्या आगोदर “कोई जाने ना’मधील विशेष परफॉर्मन्स प्रेक्षकांसमोर लवकर आला आहे. आमिर खानने इन्स्टाग्रामवर “हर फन मौला’चा फोटो शेअर करून दिग्दर्शक मित्र आमिन हाजीला पूर्ण श्रेय दिले आहे. “कोई जाने ना’ 2 एप्रिलला थिएटरमध्ये रिलीजहोणार आहे.