Earthquake In Philippines : फिलीपिन्समधील मिंडानाओ येथे आज भूकंपाचे जोरदार धक्के बसले असल्याची माहिती समोर आली आहे.
जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेस (GFZ) च्या मते, मिंडानाओ येथील भूकंपाची तीव्रता 6.9 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किमी (6.2 मैल) खोलीवर होता. आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा हानी झाल्याचे वृत्त नाही.
दरम्यान, भूकंपानंतर या भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आतापर्यंत कोणतीही जीवित पाहणी झाली नसून नागरिकांना सर्तक राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आली आहे.