ओझर – जुन्नर तालुक्यातील ओतूर हद्दीतील नगर कल्याण महामार्गावर पीकअपला ओहरटेक एस टी बसला दुचाकीने धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगर कल्याण महामार्गावर कोळमाथा येथे आज सकाळी ११.१५ च्या सुमारास हा अपघात घडला. ऋषिकेश संदीप वायकर वय २०,रा.हिवरे( ता जुन्नर),ओंकारदत्तात्रय गाडेकर,वय २१,रा घारगाव, ता.अकोले, जि अहमदनगर असे या अपघातात मृत झालेल्या तरुणांची नावे आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ठाण्यावरून मेहकरच्या दिशेला चाललेली एसटी बस ओतूर जवळील कोळमाथा येथे आली असता समोरून पिकपला ओव्हरटेक करून दुचाकी स्वार एसटीला येऊन धडकली. दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात पीकअप टेम्पो उलटला असून टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात त्यांना यश मिळाले आहे.