मॉस्को – रशियातील एका हौशी उद्योजकाने भल्यामोठ्या बोइंग विमानाचे एका व्हिलामध्ये रुपांचर केले आहे. उद्योजक आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावरच्या एका पोस्टमध्ये या हौशी उद्योजकाची आणि त्याच्या या अभिनव उपक्रमाची माहिती दिली आहे.
फेलिक्स डेनिम असे या हौशी उद्योजकाचे नाव असून त्यांनी बोइंग ७३७ विमानाचे रुपांतर लक्झरी व्हिलामध्ये केले आहे. या लक्झरी व्हिलामध्ये दोन बेडरुमसह, हिंदी महासागराच्या दृश्यांसह एक जलतरण तलाव आणि टेरेस देखील आहे.
इंडोनेशियामधील बाली बेटावर मंत्रमुग्ध करणाऱ्या न्यांग न्यांग क्लिफ्सच्यावर हा व्हिला उभा करण्यात आला आहे.आत, बार, सोफा बेड आणि काचेचे पोर्टल, तसेच वॉक-इन कपाटांसह दोन बेडरुमसह एक लिव्हिंग रूम आहे.
कॉकपिटचे एका मोठ्या बाथरूममध्ये रूपांतर करण्यात आले आहे, आणि त्याच्या मालमत्तेमध्ये सन लाउंजर्स, एक बाहेरची विश्रांतीची जागा आणि फायर पिट देखील आहे.