जिनिव्हा – इस्त्रायल-हमास युद्धात तात्काळ मानवतावादी युद्धविराम करण्याच्या मागणीसाठी संयुक्त रा,ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये अल्जेरियामध्ये एक प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद मंगळवारी मतदान करण्याची शक्यता आहे.
अल्जेरियाने दोन आठवड्यांपूर्वी प्रारंभिक मसुदा ठराव मांडला होता. परंतु या ठरावाचा मजकूर युद्धविराम देण्याच्या उद्देशाने संवेदनशील वाटाघाटी धोक्यात आणू शकतो, असे संयुक्त राष्ट्रामधील अमेरिकेचे राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड म्हणाले,
हा प्रस्ताव स्विकारण्यासाठी, संयुक्त रा,ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाच्या बाजूने किमान नऊ मतांची आवश्यकता आहे आणि अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन किंवा रशिया यांनी नकाराधिकार वापरलेला नाही.
अमेरिका या मसुद्यावरील कारवाईचे समर्थन करत नाही, असे ग्रीनफिल्ड म्हणाले. अमेरिका, इजिप्त, इस्रायल आणि कतार यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी आणि हमासने ओलिस ठेवलेल्यांची सुटका करण्यासाठी चर्चा सुरू आहे.