प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 16 – आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अर्थात 75 वा स्वातंत्र्यदिवस सोमवारी शहरभर उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वत्र डौलाने फडकत असलेले तिरंगा ध्वज, रांगोळ्यांनी सजलेले रस्ते, मैदान आणि सर्वत्र देशभक्तीपर गीतांनी बहरलेले वातावरण असे अपूर्व वातावरण दिसून आले. बाजारपेठांतही दुकानांनी तिरंगी साज परिधान केला होता. तर, शाळा, महाविद्यालये, विविध संस्था आणि संघटनांनी आपापल्या मुख्यालयी ध्वजारोहण करत भारतमातेचा जयघोष केला. राष्ट्रपुरुषांच्या वेशात आलेल्या विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये झेंडावंदनावेळी देशभक्तीपर संदेश दिले.
कृषी उत्पन्न बाजार समिती : लेफ्टनंट जनरल राजेंद्र रामराव निंभोरकर (निवृत्त) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी मेस्को सुरक्षा रक्षकांच्या परेडचे निरीक्षण केले. नियमित शेतमाल बाजारात आणणारे शेतकरी, तसेच बाजारातील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा, भुसार अशा प्रत्येक विभागातील तसेच उप बाजारातील प्रत्येक विभागातील ज्या व्यापाऱ्यांनी सर्वोच्च सेस सन 2021-22 मध्ये भरला आहे, अशा प्रत्येकी तीन याप्रमाणे सुमारे 30 आडते, बाजार समितीच्या गतिमान प्रशासनासाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या 30 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार जनरल निंभोरकर, प्रशासक मधुकांत गरड आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राजेंद्र बाठिया, बापू भोसले, आप्पासाहेब गायकवाड, अमोल घुले, संतोष नांगरे, विलास भुजबळ यांनी मनोगत व्यक्त केले.
रेल्वे इंजिनांना तिरंगी साज : सिंहगड, प्रगती आणि इंटरसिटी एक्स्प्रेस ट्रेन्सच्या वातानुकूलित डब्यांच्या खिडकीवर स्वातंत्र सैनिकांचे फोटो लावण्यात आले होते. मंडल रेल प्रबंधक रेणू शर्मा यांनी डेक्कन एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून ट्रेन मार्गस्थ केली. यावेळी बृजेशकुमार सिंह, देवेंद्र कुमार त्रिपाठी, विजय सिंह दडस, जोएल मैकेंडी, सुरेश चंद्र जैन, पुलकीत तिवारी आणि रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.
पुणे रेल्व मंडळ : सर्व स्टेशनवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुणे रेल्वे स्थानकाच्या ताडिवाला रस्ता येथील रेल्वे इन्स्टिट्यूट मैदानात रेल्वे प्रबंधक रेणू शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी रेलवे सुरक्षा बल, सेंट जॉन ऍम्बुलन्स, स्काउट ऍन्ड गाइड, सिव्हिल डिफेन्स द्वारे सलामी देण्यात आली.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ : येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. कुलगुरू आणि निवृत्त लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, डॉ. मिलिंद निकुंभ, डॉ. संदीप कडू, एन. व्ही. कळसकर, मनोजकुमार मोरे उपस्थित होते.
आधार सोशल फाउंडेशन व उत्कर्ष महिला मंडळ : शुक्रवार पेठ येथे ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर टाकळकर, विठ्ठल गोरे, गोविंद शेठ, कृष्णाजी अभ्यंकर, मिराताई पावगी, कमलाकर क्षीरसागर, गोपाळदास शेठ, रामचंद्र काळे, दिलीप काळोखे, संगीता काळोखे, सचिन शुक्ला, शाम केवटे उपस्थित होते.
सह धर्मादाय कार्यालय : येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रुपेश गायकवाड, शिवराज कदम जहागीरदार, राहूल चव्हाण, सुधीरकुमार बुक्के, राणी मुक्कावार, रेश्मा पुणसे, दिलीप हांडे, मुकुंद आगलावे, रजनी उकरंडे उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि भारतीय संस्कृती संवर्धक संस्था : मोतीबाग येथे व्यापारी अरविंद बुधानी यांच्या हस्ते ध्वजवंदन आणि भारतमाता पूजन करण्यात आले. यावेळी कसबा भाग संघचालक प्रशांत यादव आणि संस्थेचे विश्वस्त बाजीराव तथा आप्पा मणेरे, राजेंद्र वाल्हेकर उपस्थित होते.
बारा बलुतेदार संघ : संघटनेचे अध्यक्ष रामदास सूर्यवंशी यांच्या हस्ते कोथरूड परिसरात ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून रा.स्व. संघाचे पुणे महानगर प्रचार प्रमुख सुनील खेडकर उपस्थित होते. यावेळी रामदास सूर्यवंशी, अनिल व्यास, कार्यवाह सुधीर जवळेकर उपस्थित होते.
स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान : वीर बाजी पासलकर स्मारक येथे नेत्रविकार तज्ज्ञ डॉ. अनिल दूधभाते आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद शिरुले यांच्या हस्ते ध्वजवंदन आणि भारतमाता प्रतिमा पूजन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वडगावशेरी भाग कार्यालयात तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. माजी सनदी अधिकारी मोहन अडतानी यांच्या हस्ते भारतमाता पूजन आणि ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी मल्हारी चांधरे आणि स्वयंसेवक उपस्थित होते.
पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस : कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते कॉंग्रेस भवन येथे झेंडावंदन करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, अभय छाजेड, कमल व्यवहारे, वीरेंद्र किराड, दीप्ती चवधरी, लता राजगुरू, अजित दरेकर, अविनाश बागवे, रफिक शेख, सुजाता शेट्टी, अनिल सोंडकर, नितीन परतानी, दिलीप ढमढेरे, भीमराव पाटोळे, नीता रजपूत, रमेश अय्यर, बाळासाहेब अमराळे, शोभना पण्णीकर, भारती कोंढे, शमशाद बेलिम, आबा जगताप, सिमा महाडिक, प्रल्हाद खेसे, अंजली सोलापुरे, जयश्री पारेख, आशा बुजवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी व महर्षि विठ्ठल रामजी शिंदे कला महाविद्यालय : संस्थेच्या आवारामध्ये डी.सी.एम. सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डी. टी. राजपूत आणि विशाल शेवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सुनिता भोसरेकर, शिल्पा भोसले, काजल विशाल शेवाळे, मुख्याध्यापक वैभव इभाड, अशोक काळे, सचिन भालेराव, शिवाजी माने, भिमराव धांडोरे आदी उपस्थित होते.
महेश सोसायटी : कॉंग्रेस पदाधिकारी राधिका मखामले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी मखामले यांच्या हस्ते कष्टकरी मुलांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी कल्पना उनवणे, सुभद्रा धमगुडे, आरती व्हावळ, प्रमिला भागवत, लक्ष्मी दिवटे, कीर्ती शिंदे, कोमल वाळुंजकर, सीमा पवार, संतोष व्हावळ, अजिज खान, नासीर खान आदी उपस्थित होते.
कै. गणपतराव विठोबा गोळे माध्यमिक विद्यालय (गोखलेनगर) ः स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. माजी नगरसेविका पद्मजा गोळे, भाजप वैद्यकीय आघाडी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. तेजस्विनी गोळे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी एस. एस. पाटील, डब्ल्यू.व्ही.पठाण, एस. एम. जामगे, एस. एम. महाजन, एस. जी. लांघे, ए.डी. खोमणे उपस्थित होते.