पाथर्डी – शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड व नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांच्या नेतृत्वाखाली हंडाळवाडी येथे प्रचारफेरी काढून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना ताकद देण्यासाठी व मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपाच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन आव्हाड यांनी यावेळी मतदारांना केले. आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखालील पाथर्डी नगरपरिषदेमार्फत हंडाळवाडी गावात विविध मूलभूत सुविधा पुरवलेल्या आहेत.
आमदार राजळे यांचे नेहमीच येथे लक्ष असते. भविष्यकाळात मुलभुत सुविधा पुरविल्या जाणार आहेत. आपल्या हक्काचे लोकप्रतिनिधी आवश्यक असल्याने आमदार राजळेंना सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे, डॉ. पांडुरंग हंडाळ, ऍड. प्रतिक खेडकर, लक्ष्मण हंडाळ, अनिल बोरुडे, रमेश गोरे, मंगल कोकाटे, बबन बुचकुल हजर होते.