‘कबीर सिंह’चा फिमेल व्हर्जन यावा : जान्हवी

दर्जेदार आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश असणारा हे मामि अर्थात मुंबई फिल्म फेस्टिवल २०१९ मुंबईत सुरु होणार आहे. यात मेला विथ स्टार मध्ये अनेक बॉलिवूड सेलेब्रीटी हजेरी लावत आहेत. यामध्ये अभिनेत्री जान्हवी कपूरनेही हजेरी लावली होती. यावेळी तिने कबीर सिंह आणि जोकर चित्रपटाचे फिमेल व्हर्जन निघावे, अशी इच्छा व्यक्त केली.

 

View this post on Instagram

 

Sorry for the spam guyz

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

जान्हवी कपूर म्हणाली कि, काळ बदलत असून महिलांना दाखवण्यासाठी आणखी जास्त भूमिका असायला हव्यात. अशामध्ये कबीर सिंह आणि जोकर चित्रपटांचा फिमेल व्हर्जन सांगता येईल.

अभिनयामध्ये सर्वात जास्त काय आवडते असे विचारल्यास जान्हवीने म्हंटले कि, कॅमेराच्या समोर असणे ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब असते. याशिवाय प्रवास करणे आणि अभिनयादरम्यान मिळणारा अनुभवही मला खूप आवडतो.

दरम्यान, जान्हवी कपूर सध्या ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. याशिवाय ती पहिल्यांदाच राजकुमार रावसोबत ‘रूहफ्जा’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटातही झळकणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)