नवी दिल्ली – अमेरिकेसह अन्य सहा देशांनी कमी घनतेच्या पॉलिथिनचे भारतात डम्पींग चालवले आहे. या प्रकरणात एका औद्योगिक संघटनेने तक्रार केल्यानंतर या प्रकाराची चौकशी करण्याचा आदेश भारत सरकारने दिला आहे.
केमिकल ऍन्ड पेट्रोकेमिकल्स मॅन्युफॅक्चररर्स असोशिएशनने या प्रकरणात केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. कतार, सौदी अरेबिया, सिंगापुर, थायलंड, संयुक्त अरब अमीरात आणि अमेरिका या देशांकडून भारतात कमी घनतेचे पॉलिथीन आणून टाकले जात आहे असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हे पॉलिथीन भारतात आयात केले जात असल्याने भारतातील उत्पादक कंपन्यांना याचा फटका बसत आहे असेही या संघटनेचे म्हणणे आहे. या संघटनेने केलेली तक्रार आणि त्यांनी सादर केलेले पुरावे लक्षात घेऊन संबंधीत मंत्रालयाने या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश दिला आहे.
या पॉलिथीनच्या आयातीमुळे स्थानिक उद्योगांना नुकसान येत असेल तर या आयातीवर ऍन्टी डम्पींग ड्युटी लावली जाईल असेही संबंधात अधिकाऱ्यांनी सांगितले.