पुणे – “लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड”च्या वतीने रौप्यमहोत्सवी वर्षाच्या सांगता निमित्ताने “ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉम”ची (https://lokmanyaonline.com/deposit) सोय सभासद, ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासुविधेमुळे सभासद, ग्राहकांना आता घरबसल्या “लोकमान्य सोसायटी”मधील विविध ठेव योजनांमध्ये पैसे गुंतविता येणार आहेत.
पंचवीस वर्षांपासून सभासद, ग्राहकांशी असलेले विश्वासाचे नाते अधिक दृढ करत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहककेंद्रित सुविधा उपलब्ध करून देत “लोकमान्य सोसायटी ” एक पाऊल पुढे टाकते आहे, अशी प्रतिक्रिया “लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड”चे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांनी दिली. प्रत्यक्ष “सोसायटी”मध्ये येऊन गुंतवणूक करण्यात इतकीच विश्वासार्ह ही सोय असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
या सुविधेद्वारे मुदतठेवी, बचत, आवर्ती ठेव (रिकरिंग डिपॉझिटस्) या व अशा इतर योजनांमधील गुंतवणुकीसाठी या डिजिटल प्लॅटफॉमचा वापर सभासद ग्राहकांना करता येणार आहे. तसेच सभासदांना विविध ठेव (आवर्ती, मुदत व बचत) योजनांची माहिती, त्यावर मिळणारे व्याज त्याअनुषंगाने माहिती पडताळून पाहण्यासाठी “इंटरेस्ट कॅल्क्युलेटर”ची सोय देखील या प्लॅटफॉमवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सुविधेच्या अधिक माहितीसाठी ग्राहकांनी https://lokmanyaonline.com/deposit या संकेतस्थळाला भेट द्यावी व त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन “लोकमान्य सोसायटी “तर्फे करण्यात आले आहे.