मुंबई – सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना आजही उच्च न्यायालयाचा दिलासा मिळू शकला नाही.
न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जाची सुनावणी 29 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. त्यामुळे रियाचा भायखाळा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे.
रिया चक्रवर्ती आणि तिच्या भाऊ शौविक यांनी जामिनासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार होती. काल मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आजही रियाच्या जामीन अर्जावर सुनावणी होवू नाही.
हायकोर्टाने ती 29 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. यामुळे रियाच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली असून तिचा आणि तिच्या भावाचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.