नगर -कोठला स्टॅंड येथील राज चेंबर्समध्ये अवैध धंदे सुरु आहेत. तेथे गांजा, दारु पिऊन सर्वसामान्य व्यावसायिक व नागरिकांना त्रास देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा बदोबस्त करण्याची मागणी राज चेंबर्स येथील व्यावसायिकांनी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी संजय नावंदर, नरेंद्र पटेल, बी. अनिल, मुनाफ बागवान, आर. बी. मल्होत्रा, ए. एस. अमजद, अन्सार सय्यद, जावेद शेख आदी उपस्थित होते.