नवी दिल्ली – कोरोनाचा सर्वाधित फटका बसलेल्या महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी हाती आली आहे. केंद्रीय आरोग्य विभागानं सादर केलेल्या आकडेवारीवरून महाराष्ट्रातील अॅक्टिव्ह केसेसमध्ये ७ टक्क्यांची घट झाली असून याबाबतची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली.
आरोग्य विभागाच्या आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली.
मृत्युदरातही घट
कर्नाटक आणि दिल्लीत आठवड्याला होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीत ५० टक्के तर कर्नाटकात ९.६ टक्क्यांची वाढ झाल्याचं सांगण्यात आलं. तर महाराष्ट्रात मृत्यू दरात ११.५ टक्क्यांची तर तामिळनाडूमध्ये १८.२ आणि आंध्र प्रदेशात ४.५ टक्क्यांची घट झाल्याचे प्रशांत भूषण म्हणाले.
या राज्यातही अॅक्टिव्ह केसेसमध्ये घट
आंध्र प्रदेशातही अॅक्टिव्ह केसेसमध्ये आठवड्याच्या आधारावर १३.७ टक्क्यांची घट झाली आहे. तर कर्नाटकमध्ये १६. तामिळनाडूत २३.९ तर उत्तर प्रदेशात १७.१ टक्क्यांची घट झाल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.
या राज्यांमध्ये अॅक्टिव्ह केसेसची संख्या अधिक
सध्या पाच राज्यांमध्ये अॅक्टिव्ह केसेसची संख्या अधिक असल्याचंही त्यांनी सांगितलं. तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात मिळून एकूण अॅक्टिव्ह केसेसच्या ६२ टक्के केसेस आहेत. तसंच आंध्र प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात या राज्यांमध्येच एकूण मृत्यूंच्या ७० टक्के मृत्यू झाल्याची माहिती राजेश भूषण यांनी दिली.